रत्नागिरी : देवरुख (ता. संगमेश्वर) येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याचा आरोप असलेल्या टोळीतील संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. सागर प्रकाश कदम (वय ३४, कदमवाडी, हातखंबा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १७सप्टेंबर २०२५ ला रात्री देवरुख-साखरपा रस्त्यावरील वांझोळे येथे घडली होती. १७ ला रात्री देवरुख येथील व्यापारी धनंजय केतकर यांच्या चेहऱ्यावर काळा बुरखा घालून जबरदस्तीने मोटार गाडी कोंबून अपहरण करण्यात आले होते.
अपहरणकर्त्यांनी केतकर यांच्याकडून १४ लाख किमतीच्या सोन्यासह २० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. तसेच केतकर यांना वाटूळ येथे पुलाखाली सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सागर हा गुन्ह्यातील मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून सागर हा पसार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. अटक टाळण्यासाठी सागरने जिल्हा सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो फेटाळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 19/Nov/2025














