खेड : नगर परिषद वसाहतीच्या मागील कातळ आळी परिसरातील मोकळ्या जागेत चालू असलेल्या बेकायदा हातभट्टी दारू विक्रीवर खेड पोलिसांनी कारवाई करत एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली.
पोलिस नाईक शिल्पा उत्तम डगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकीशोर धनंजय वारेकर (वय ४०, रा. मुलगाव देठळवाडी, ता. खेड) हा परवानगीशिवाय गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असताना पोलिसांना आढळून आला. सदर प्रकरणात पोलिसांनी सुमारे ५ लिटर हातभट्टी दारू, कॅनसह अंदाजे ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 20/Nov/2025














