खेड : तालुक्यात ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे भात पीक आडवे होऊन १ हजार ७०२ शेतकऱ्यांना तडाखा बसला. ५०३ हेक्टर क्षेत्रांतील भात पीक बाधित झाले असून, ‘कृषी न विभागाने’ केलेल्या पंचनाम्यानुसार ४२ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
हे नुकसानग्रस्त शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. भिजलेली भात पिके कुजून भाताची मोठी नासाडी झाली आहे. यामुळे उत्पादनात घट झाली असून अजूनही शेतकरी भात कापणीच्या कामात गुंतले आहेत. नुकसानग्रस्त भातपिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे करून तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शासन स्तरावरून मदत मिळतेय कधी, याचीच शेतकरी आता आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 20/Nov/2025














