रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील करंजारी परिसरात वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू

देवरूख : राष्ट्रीय रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील करंजारी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारास १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर पडलेल्या मृत सांबराची माहिती मिळताच वन विभागाने त्वरित हालचाली सुरू केल्या. परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांच्यासह दाभोळे येथील वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपाचे सहायक वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूसचे आकाश कडुकर आणि आरवलीचे सूरज तेली यांनी घटनास्थळी भेट देत मृत सांबराची पाहणी करून पंचनामा केला.

या अपघातात धडक देणारे वाहन अद्याप अज्ञात असून, संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 09/Dec/2025