Mandangad : तळेघर व म्हाप्रळ येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमीपूजन

मंडणगड : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तळेघर व म्हाप्रळ या गावांमध्ये 5 जानेवारी 2025 रोजी विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले या निमीत्ताने तळेघर येथे आयोजीत कार्यक्रमात भोळवली येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी सभापती अनंत लाखण, रामदास रेवाळे, अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे, दीपक मालुसरे, इरफान बुरोंडकर, चेतन सातोपे, नितीन म्हामुणकर दयानंद येसरे, अनंत शिंदे, अरुण माने, संतोष पार्ट, मनोहर पारदुले, यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौजे तळेघर, येथे ग्रामविकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’ अंतर्गत कादवण वखारवाडी तळेघर रस्त्यावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कामासाठी 3 कोटी 5 लाख 61 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे निमीत्ताने आयोजीत स्वागत समारंभात बोलताना श्री. योगेश कदम म्हणाले या रस्त्याचे भूमिपूजन मी आमदार असताना केले होते आणि आज या पुलाचे भूमिपूजन मी ग्रामविकास राज्यमंत्री असताना होत असल्याने समाधान वाटते. आमदार असताना जेवढी विकासकामे मतदारसंघात केली, त्याहून जास्त विकासकामे मंत्री असताना करेन असा विश्वासही व्यक्त केला. शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील भोळवली येथील असंख्य ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जेष्ठ ग्रामस्थ श्रीरंग राणे यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या परिस स्पर्शान आमचेही सोन झालेले असल्याचे व पक्ष देईल ते काम संघटना वाढीसाठी आम्ही निष्ठेने करणार असल्याचे यावेळी सांगीतले. याचबरोबर (5) रोजी केलेल्या तालुक्याचे दौऱ्यात श्री. योगेश कदम यांनी तालुक्यातील मौजे म्हाप्रळ, येथील जेट्टी व पोचमार्ग दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन केले. या कामासाठी 2 कोटी 34 लाख निधी मंजूर करण्यात झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 06/Jan/2026