संगमेश्वर तालुक्यातील तीन महिला नापत्ता

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून तीन महिला नापत्ता झाल्या आहेत. या महिलांबाबत कोणाला माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुनंदा सखाराम भालेकर, वय 65 वर्षे, रा. चाफवली, उगवतीवाडी, ता. संगमेश्वर या दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी 9 वा. च्या सुमारास चाफवली येथून नापत्ता झालेल्या आहेत. त्यांची उंची 5 फूट वर्ण निमगोरा, केस पांढरे बॉब कट केलेला, नेसणीस सावारी साडीचे दोन तुकडे ब्लावुज, मोजके बोलणे, 28 वर्षा पासून मनोरुग्ण आहे.

श्रीमती विजया हरिश्चंद्र लिंगायत, वय 75 वर्षे, रा. मौजे साखरपा गुरववाडी, ता. संगमेश्वर, हे दि.3 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वा. चे सुमारास साखरपा, ता. संगमेश्वर येथून नापत्ता झालेले आहेत. त्यांचा चेहरा उभट, केस पांढरे, नाक-सरळ, रंग-सावळा, उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, नेसणीस-सहावारी साडी आबोली कलरची, कानात नकली कुडी, गळ्यात काळा दोरा, पायात साधे चप्पल, शिक्षण झालेले नाही, तिचे अंगावर सोन्याचे दागिने अगर पैसे नाहीत.

स्वाती चंद्रकांत लोहार, वय 40 वर्षे, रा. तुळसणी, राउळवाडी, ता. संगमेश्वर या दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी 12.30 ते 13.30 वाजताच्या दरम्यान तुळसणी, राउळवाडी, ता. संगमेश्वर येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची 5 फूट 2 इंच, शिक्षण 10 वी पास, धर्म- हिंदु सुतार, अंगात टॉप व जिन्स आहे, अंगाने सडपातळ, रंग- गोरा, केस काळे व लांब, चेहरा गोल, नाक सरळ, गळ्यात सोनेरी धातुची चैन, कानात- नकली टॉप, उजवे हाताचे अंगठ्याचे वरील बाजूस गोंदलेले, तिचे जवळ रेडमी 9 ए कंपनीचा मोबाईल त्यामध्ये जिओ सिम नं. 9226638601 आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 08/Jan/2026

Tata punch