Shivsena, NCP Crisis: धनुष्यबाण, घड्याळाची आज सर्वोच्च न्यायालत सुनावणी!

नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

२१ जानेवारीला सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही, तर २२ रोजीसुद्धा सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेनेचे नाव व निवडणूक चिन्हाशी संबंधित याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. दोन्ही पक्षांतील हे प्रकरण दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. अशात, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीनेच २१ जानेवारीला पुढील सुनावणी होईल.

दोन्ही गटांना युक्तिवाद करण्यासाठी तीन तास वेळ

Tata aeris

एका दिवसात सुनावणी पूर्ण होऊ नाही शकली तरी दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रकरण ऐकून घेतले जाईल. यामुळे २२ जानेवारीला कोणतेही महत्त्वाचे प्रकरण सूचिबद्ध करू नये, असे निर्देश सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मागच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांना दिले होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना अंतिम युक्तिवाद करण्यासाठी प्रत्येकी तीन-तीन तासांची वेळ देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 21-01-2026