रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत पाठिंब्यासाठी मनसे स्वतंत्र सभा घेणार

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देण्याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे या मतदारसंघात मनसेचा उमेदवार असणार नाही. मुंबईत उमेदवारीसाठी गेलेले तालुकाध्यक्ष रूपेश जाधव आणि त्यांचे सहकारी रत्नागिरीत परतले.

त्यामुळे आता मनसेचा कोणाला पाठिंबा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे मनसेचा ज्या उमेदवाराला पाठिंबा मिळेल त्या मतदारसंघात मनसेचे स्वतंत्र मेळावे होण्याची शक्यता आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्यात सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचे सांगितले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 30/Oct/2024