दापोलीत सिमकार्ड विक्रीत ग्राहकांची लूट!

दापोली: दापोली तालुक्यात खासगी मोबाईल कंपन्या आणि सरकारी दूरसंचार कंपनी (BSNL) च्या सिमकार्ड विक्रीत ग्राहकांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. निर्धारित किमतीपेक्षा अधिक रक्कम आकारून दुकानदार ग्राहकांना गंडा घालत असल्याचा आरोप होत आहे.

लूट कशी होतेय?

  • BSNL सिम: प्रत्यक्षात २० रुपयांना मिळणारे कोरे सिमकार्ड दुकानदार चक्क ६० रुपयांना विकत आहेत.
  • खासगी कंपन्या: काही खासगी कंपन्यांचे सिम केवळ १ रुपयाला उपलब्ध असताना ग्राहकांकडून १० रुपये उकळले जात आहेत.

या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप असून संबंधित कंपन्यांनी दरपत्रकाबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात आणि प्रशासनाने दोषी दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दापोलीवासीयांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 16-02-2026

Shiva optical