हिंदी शिक्षक महामंडळाची आज चिपळुणात सभा

चिपळूण : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाची रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटनेची सभा दि. २४ रोजी चिपळूण येथे होणार आहे. सकाळी ११ वा. माधव सभागृहात ही सभा होईल. यावेळी जिल्ह्यातील हिंदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.

यावेळी जिल्ह्यातील हिंदी शिक्षकांना आदर्श हिंदी शिक्षक म्हणून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये उदय पाटील (हर्चे), राजेश माळी (नायशी), मंजिरी शितूत (पालगड), वैशाली भोदारे (खवटी), प्रदीप पवार (देरूड), जिजाऊ पवार (मुंढर), मुरलीधर खानविलकर (ओझर), सौ. अनिता कोकरे (वेसवी), मनोहर धनावडे (दाभोळ) यांना गौरविण्यात येईल. यावेळी हिंदी कथा व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, मुख्याध्यापक माळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर, कार्याध्यक्ष राजेंद्र खांबे, प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 24-09-2024