दापोली : शेतकरी असल्याचा खोटा सातबारा तयार केल्याप्रकरणी एकवार गुन्हा

Jun 13, 2024 - 10:21
Jun 13, 2024 - 10:27
 0
दापोली : शेतकरी असल्याचा खोटा सातबारा तयार केल्याप्रकरणी एकवार गुन्हा

दाभोळ : शेती नसतानाही स्वतःच्या नावाने शेतकरी असल्याचा खोटा सातबाराचा उतारा तयार केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अतुल ही लिमये (वय ५८, रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी जालगाव ग्रामपंचायत हद्दीतील ३३ गुंठे जमीन चिंतामणी नरहर फाटक व नयन चिंतामणी फाटक (रा. अलिबाग) यांना ६ लाख रुपये देऊन खरेदी करून त्याचे खरेदी खत ३० मार्च २०११ ला दुय्यम निबंधक कार्यालय येथे तयार केले. खरेदी खत करताना लिमये हे शेतकरी कुटुंबातील नसतानाही शेतकरी असल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नावे शेतजमिनीचा मौजे होतले (मुळशी, पुणे) येथील खोटा सातबाराचा उतारा तयार करून तो खरेदी खतासोबत जोडून शासनाची फसवणूक केली. म्हणून जयदीप जयवंत
बलकवडे (रा. पुणे) यांनी लिमये यांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीनुसार अतुल लिमये यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गंगधर करत आहेत.

तक्रार घेण्यास टाळाटाळ
या संदर्भात बोलताना तक्रारदार जयदीप जयवंत बलकवडे म्हणाले की, मी दापोली पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०२३ मध्ये तक्रार अर्ज दिला होता; मात्र तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे मी या संदर्भात राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केल्यावर दापोली पोलिसांनी १० जूनला माझी तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी सुमारे १० महिने माझी तक्रार दाखल न करण्यामागे नेमके कारण मला अजून समजू शकलेले नाही.  

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow