जादा फेऱ्यांमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले..

Sep 6, 2024 - 10:16
Sep 6, 2024 - 10:19
 0
जादा फेऱ्यांमुळे  कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले..

खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी कोकण रेल्वेने यंदा मध्यरेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने ३१० विशेष ट्रेन फेऱ्या चालवल्या आहेत. बहुसंख्य चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जादा फेऱ्यामुळे वेळापत्रकावर परिणाम झाला. एक ते दोन गाड्या उशिराने धावत होत्या. शनिवारी गणेशोत्सवास असल्यामुळे चाकरमानी कोकण रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध स्थानकांवर दाखल झालेले आहेत.

नियमित गाड्यांसह जादा फेऱ्या सोडलेल्या आहेत. एक लाखाहून अधिक चाकरमानी रेल्वेने आलेले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जादा गाड्यांमुळे नियमित फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून, अनेक गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. दहा तासांचा प्रवास बारा ते तेरा तासांवर जात होता पसेंजर गाड्यांच नव्हे तर एक्स्प्रेस गाडांनाही प्रचंड गर्दी होती.

अनेकांनी उभ्याने प्रवास केलेला होता. कोकण रेल्वेमार्गावर गेले दोन दिवस जादा फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये उधना, विश्वामित्र, सुरत, अहमदाबाद, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएमएमटी, लोकमान्य टिळक (टी), वांद्रे पनवेल ते मडगाव, सुरतकल, ठोकूर आणि मंगळुरू या मार्गावर चालवण्यात आल्या आहेत.

राज्य आरोग्य प्राधिकरणांच्या समन्वयाने माणगाव खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली कुडाळ आणि प्रथमोपचार स्थनाकावर चौक्या उभारण्यासह प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी सुनिनिश्चित करण्यासाठो व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारी रुग्णालये आणि पनवेलमधील रुग्णालयांमधील स्थानावरुणवाहिका सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी, युटीएस तिकिटांच्या बुकिंगची सुविधा सध्याच्या ७ पीआरएस स्थानांवर म्हणजे माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर गणपती उत्सव आहेत. माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर अतिरिक्त युटीएस तिकीट बुकिंग विंडो उघडली जाईल. ठराविक अंतराने स्थानकांवर नियमित घोषणा उपलब्ध केल्या जातील प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर 'यात्री साहाय्यक' तैनात केले आहेत.

२५ स्थानकांवर क्युआर कोड उपकरण
कोकण रेल्वेने २५ स्थानकांवर डायनेमिक क्यूआर कोड उपकरणांचे कार्य सुरू केले आहे आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. प्रवाशांना अधिक सुविधा दिल्या आहेत. रोख हाताळणीसाठी खर्च करण्यात येणारा वेळ कमी करून ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणे हा उद्देश रेल्वे प्रशासनाने ठेवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow