खेड : देवघर-सोंडे ग्रामपंचायतीतर्फे पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा निर्णय

Jun 13, 2024 - 11:12
Jun 13, 2024 - 11:57
 0
खेड : देवघर-सोंडे ग्रामपंचायतीतर्फे पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा निर्णय

खेड : पावसाळ्यात मुबलक पाऊस पडूनही पाणी वाया जाते. पावसाचे पाणी अडवण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने अनेक गावांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला समोर जावे लागते. तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शोषखड्यांची खोदाई केली जाणार असून, त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे देवघर-सोंडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दीपक कदम यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामे मार्गी लावताना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत ग्रामस्थांना त्यात सहभागी करून घेण्यामध्येही तितकाच भर दिला जात आहे. ग्रामस्थही ग्रामपंचायतीच्या उपक्रमांमध्ये हिरीरिने नोंदवत उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचमुळे ग्रामपंचायतीचाही हुरूप वाढत असून, ग्रामस्थांसाठी अनेक हितकारक योजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. देवघर-सोंडे येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ पोहचत नसली तरी पावसाच्या पाण्यातून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे.

प्रत्येक शोषखड्डात १ हजार लीटर पाणी जिरवणार
प्रत्येक ग्रामस्थाच्या घरावरील छपरावरील पडणारे पावसाचे पाणी संकलन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामस्थांना शोषखड्डे खोदण्यास सांगण्यात आले. या खड्यांमध्ये १ हजार लिटर पाणी जिरवले जाणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, या पाण्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow