खेड : जांभा खाणीत २६ लाखांच्या वीज चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Jun 14, 2024 - 10:28
 0
खेड : जांभा खाणीत २६ लाखांच्या वीज चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील मुळगाव व तळघर येथील जांभा खाणीत महावितरणची वीज चोरून वापरल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघड केला. यामध्ये तब्बल २६ लाख २४ हजार २३० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा प्रकार फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मूळगाव, तळघर येथे घडला होता. याप्रकरणी पेण येथील भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता विजय धरमसारे यांनी येथील पोलिस स्थानकात तकार दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow