संगमेश्वर : माभळे पुनर्वसन येथे भराव खचला

Jun 15, 2024 - 11:24
Jun 15, 2024 - 11:40
 0
संगमेश्वर :  माभळे पुनर्वसन येथे  भराव खचला

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात चौपदरीकरणाची कामे अनेक ठिकाणी दर्जेदार झालेली नाहीत, या कामामुळे माभळे पुनर्वसन येथे भराव खचल्यामुळे चौपदरीकरणाच्या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. हा भराव आणखी खचत गेल्यास महामार्ग वाहतुकीस बंद होण्याची भीती आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यात रखडले आहे. येथील मोऱ्यांसह अनेक ठिकाणी बांधकामे खचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असून वाहनेही चिखलात रुतली आहेत. अनेक ठिकाणी अरुंद रस्त्त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत.

जोडरस्ते धोकादायक बनलेले असून, रस्त्याला पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांमध्ये अंदाज येत नसल्याने महामार्ग धोकादायक बनलेला आहे. संगमेश्वरजवळच्या माभळे पुनर्वसन वस्तीजवळ पावसामुळे नवीन केलेल्या चौपदरीकरणाचे रस्त्याच्या बाजूला भराव साचला आहे. या प्रकारामुळे महामार्ग धोकादायक बनला आहे. संरक्षण भिंतीचे काम अर्धवट झाल्यामुळे खचलेला भराव खाली जात असून, त्यामुळे याठिकाणी चौपदरीकरणाच्या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. ठेकेदार कंपनीने अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे त्याचा फटका वाहनचालकांना आणि स्थानिकांना बसत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 15/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow