रत्नागिरी : तांबट आळीत जलवाहिनी फुटून पाणी वाया

Sep 12, 2024 - 10:09
 0
रत्नागिरी :  तांबट आळीत  जलवाहिनी फुटून पाणी वाया

रत्नागिरी : शहरातीला तांबट आळी येथे काल सायंकाळी उशिरा जलवाहिनी फुटल्यामुळे हजारों लिटर पाणी वाया गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाने जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला. 

मात्र तोपर्यंत पाणी वाया गेले होते. तत्काळ दुरुस्ती करण्याची यंत्रणा नसल्यामुळे उद्या या परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी शहरामध्ये ६७ कोटी खर्च करून नवीन पाईपलाईन टाकाण्यात आलेली आहे; परंतु शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा दाब वाढल्यामुळे अचानक पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत. काल रात्री आठच्या सुमारास तांबट आळी येथे अचानक पाईपलाईन फुटली, पाण्याला दाब असल्यामुळे वेगाने पाणी बाहेर पडू लागले. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिक संभ्रमात होते. रस्त्यावर सगळीकडेच पाण्याचे तळ झाले होते. याबाबत नगरपालिका प्रशासनाला कळवण्यात आल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जमिनीमध्ये पाईपलाईन टाकलेली असल्याने ती खोदून दुरुस्ती करावी लागणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या परिस्थितीत तातडीने दुरुस्तीची कामे करणे अशक्य आहे. सध्या प्रशासनाने पाईपलाईन फुटलेल्या परिसरात बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow