अणुस्कुरा घाटातील वाहतूक २३ तासानंतर सुरळीत

Jun 15, 2024 - 11:23
 0
अणुस्कुरा घाटातील वाहतूक २३ तासानंतर सुरळीत

राजापूर : गुरुवारी (दि.13) सायंकाळी साडेसातच्या वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने सदर मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड बाजूला करून वाहतूक मार्ग सुरळीत केला.

मोठा दगड मार्गवर येऊन पडल्यामुळे घाट रस्ता काही दिवस बंद पडेल अशी शक्यता होती. मात्र, राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता शंतनू दुधाडे अधिकारी स्वप्नील भावधनकर आणि त्यांचे सहकारी यांसह राजापूर पोलीस प्रशासन यांनी अथक मेहनत घेतली व घाटातील दरड हटविली. सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान संपूर्ण घाट मार्ग मोकळा केला आहे. आता घाटातील वाहतूक पूर्ववत झाली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow