खेड : घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लांबवला

Sep 9, 2024 - 11:50
 0
खेड : घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लांबवला

खेड : गणेशोत्सवाच्या धामधुमीत खेड येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे २ लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ६ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास ही चोरी उघड झाली. या प्रकरणी चोरट्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी दादा महादेव देवरुखकर यांनी तक्रार दाखल केली आहे. ६ सप्टेंबरला दुपारी १.३० ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत देवरूखकर यांचे घर बंद होते. त्याचा फायदा चोरट्यांनी उठवला. चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधील २ लाख १८ हजारांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow