गोदूताई जांभेकरचा दहावीचा निकाल ९२.३७ टक्के
रत्नागिरी : आर. ए. सोसायटीच्या गोदूताई जांभेकर विद्यालयाचा निकाल ९२.३७ टक्के लागला असून, १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेमध्ये विनायक सुरेश माने हा विद्यार्थी प्रथम आला असून, त्याला ८५.६० टक्के गुण मिळाले. द्वितीय क्रमांक स्वरुपा प्रकाश आंबरे हिला ८२.६० टक्के तर सृष्टी प्रदीप खापरे हिने ७९.२० टक्के गुण मिळवत शाळेत तिसरी येण्याचा मान मिळवला. जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 28-05-2024
What's Your Reaction?