कोल्हापूर अंबाबाईच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

Aug 16, 2024 - 11:41
Aug 16, 2024 - 11:43
 0
कोल्हापूर अंबाबाईच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

पुणे : आदिती पब्लिकेशन्सच्या वतीने राज्याचे कुलदैवत कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मंदार वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन दि. १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे भरविण्यात येणार आहे. 

दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मूर्तिशास्त्र अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर, विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रृतिका राऊतवार, मध्य रेल्वे मुंबई विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिबनाथ बियाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात महालक्ष्मीची विविध रूपे, मंदिराचे उपलब्ध असलेले सर्वात जुने छायाचित्र, देवीच्या मूर्तीचे उपलब्ध असलेले सर्वात जुने छायाचित्र तसेच देवीची साकारलेली विविध रूपातील पूजा यांची मांडणी करण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow