चिपळूण : वनविभागाने 'त्या' कात कंपनीला उत्पादन बंद करण्याचे दिले आदेश

Jun 8, 2024 - 11:42
Jun 8, 2024 - 11:52
 0
चिपळूण  :  वनविभागाने 'त्या' कात कंपनीला उत्पादन बंद करण्याचे दिले आदेश

चिपळूण : सांगोला येथील वनविभागाच्या पथकाने विसापूर (ता. दापोली) परिसर एका कात कंपनीवर गेल्या महिन्यात छापा टाकल्यानंतर ती सील करण्यात आली आहे. कंपनीमध्ये सापडलेला खैराचा साठा अनधिकृत नसल्याचा दावा मालकाने केला आहे; मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्पादन बंद करण्याचे आदेश वनविभागाने त्या कंपनी मालकाला दिले आहे.

विसापूर (ता. दापोली) परिसरात एका कात कंपनीवर मे महिन्यात वनविभागाच्या सांगोला येथील पथकाने छापा टाकला. सांगोला येथून आणलेला ४७००० किलो खैराचा लाकूड जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय कंपनीतील गौर लाकडाचे २४१ नग जप्त करण्यात आले आहेत. कातासाठी बनवलेले ३ हजार ७२० लिटरचे ९३ कॅन जप्त करण्यात आले आहेत. कंपनीमध्ये सापडलेला खैराचा साठा अधिकृत असल्याचे मालकांनी सांगितले, मात्र वनविभागाने पासाची मागणी केल्यानंतर तो त्यांना दाखवता आले नाही. त्यामुळे नियमानुसार वनविभागाने संबंधित कांत कंपनी सील केली असून, उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित कात कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली आहे. कंपनीकडे खैर वाहतुकीचा पास किंवा अन्य काही पुरावे असतील तर त्यांना दाखवावे लागणार आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले आहेत. -वैभव बोराडे, सहायक वनसंरक्षक, वनविभाग, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 08/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow