चिपळूण : गावाच्या विकासासह पक्ष मजबूत करा : आ. शेखर निकम

Jun 25, 2024 - 11:57
 0
चिपळूण : गावाच्या विकासासह पक्ष मजबूत करा : आ. शेखर निकम

चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत इनकमिंग चालू आहे. आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गावागावांतील इतर पक्षातील लोक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.


संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख, माळवाशी, धारेचीवाडी ग्रामस्थांनी आमदार निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सावर्डे येथील आमदार निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. प्रवेश कर्त्यांमध्ये विजय शिंदे, सुशिंद्र पवार, मुरलीधर पवार, दीपक शिंदे, संदेश सावंत, विलास शिंदे, भास्कर करंडे, कैलास करंडे, संतोष सावंत, दुर्वाक शिंदे यांचा समावेश आहे. आमदार शेखर निकम यांनी वाशीतर्फे देवरुख, माळवाशी, धारेचीवाडी ग्रामस्थांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. त्या सर्वांशी संवाद साधला आणि गाव विकासाबाबत चर्चा केली. विकास निधीबाबत निश्चिंत राहून पक्ष वाढीच्या कामाला लागा, माझे प्रत्येक चांगल्या कामात आपणास सहकार्य असेल, असा शब्द दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow