दापोली : हर्णे बंदरच्या मुख्य रस्त्यावर खड्डयांचं साम्राज्य

Jun 29, 2024 - 10:20
Jun 29, 2024 - 10:22
 0
दापोली : हर्णे  बंदरच्या  मुख्य रस्त्यावर खड्डयांचं साम्राज्य

दापोली :  दापोलीतील पर्यटन मार्ग आणि हर्णे बंदर या मुख्य मार्गावर असंख्य खड्डे पडले असून यामुळे प्रवासी आणि येथील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील मोठे आर्थिक केंद्र असलेल्या हर्णेमध्ये अद्यापही चांगल्या रस्त्यांची ग्रामस्थांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही.

मुख्य रस्त्यासह सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारक आणि पादचारी असा सर्वांनाच होत आहे. दापोली तालुक्यातील हर्णे हे मोठे मासेमारी बंदर असलेले गाव आहे. येथे आर्थिक उलाढाल मोठी होत असल्याने येथे स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार, व्यापारी यांची लोकवस्ती वाढली आहे. मात्र शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या हर्णेमध्ये अद्यापही आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाही. मुख्य रस्त्यांवर तर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्वरित दुरुस्तीची तयारी दिसत नाही. यंदाही हर्णेतील प्रवास जिकिरीचा असून स्थानिक लोकप्रतिनिधींचा याकडे दुर्लक्षच होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow