खेड : लोटे औद्योगिक परिसरात रासायनिक सांडपाणी उघड्यावर; मनसेच्या कामगार सेनेची कारवाईची मागणी

Jul 1, 2024 - 10:15
Jul 1, 2024 - 10:18
 0
खेड : लोटे औद्योगिक परिसरात रासायनिक सांडपाणी उघड्यावर; मनसेच्या कामगार सेनेची कारवाईची मागणी

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील दोन कारखान्यांतून दि. २३ रोजी उघडयावर रसायन मिश्रित सांडपाणी सोडण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मनसेच्या कामगार सेनेने याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणती कारवाई करण्यात आली हे मात्र शासनाकडून स्पष्ट करण्यात आले नाही लोटे औद्योगिक वसाहत  परिसरात पावसाळा सुरु झाल्यापासून परिसरात दुर्गंधी वाढली आहे. प्रदूषण निमंत्रण मंडळाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे, रासायनिक कंपन्यांनी प्रक्रिये नंतर रसायन मिश्रित सांडपाणी सीईटीपीमध्ये सोडून त्यावर प्रक्रिया करून नंतर ते लांब खाडीत सोडणे अपेक्षित आहे.

त्यासाठी प्रत्येक कंपनीकडून ठराविक शुल्क सीईटीपीमार्पत आकारले जाते. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी काही लहान आणि मध्यम कंपन्याकडून  पावसाळयात रसायन मिश्रित सांडपाणी सरल सरळ उघडयावर ओढे आणि नाल्यात सोडून दिले जाते. असाच प्रकार दि. २३ रोजी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर उघड्यावर घातक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे सरचिटणीस संजय आखाडे यांनी ज्या दोन कंपन्यांच्या परिसरातून पावसाच्या पाण्यासोबत रसायन मिश्रित पाणी येत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे. खान इंडस्ट्रीज कंपनी व लाला कंपनीच्या आवारातून थेट वाहत्या गटारामध्ये व नाल्यांमध्ये पाणी सोडले जात आहे, असा आरोप आखाडे यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रदू‌षण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील आखाडे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow