घरकूल योजनेत लाभार्थ्यांची चेष्टा; मनोहर गुरव

Jul 1, 2024 - 10:41
Jul 1, 2024 - 16:43
 0
घरकूल योजनेत लाभार्थ्यांची चेष्टा;  मनोहर गुरव

देवरूख :  घरकूलसाठी येणारा खर्च व प्रत्यक्षात शासन घरकूलसाठी देत असलेली टप्प्या-टप्प्यातील रक्कम यात तफावत आहे. यामुळे घरकूल योजनेतून लाभार्थी वर्गाची चेष्टा होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी केला आहे. काही लाभार्थ्यांना ह्प्ते आलेले नाहीत. शासनाने वाळू मोफत देण्याचे आदेश दिले असून, खरोखर वाळू मोफत दिली जात आहे का, हा प्रश्नच आहे. घर हे एकदाच बांधायचे असते. त्यासाठी एक लाख ते दीड लाखात कसे बांधणार? हा लाभार्थींच्या काळजात हात घालणारा विषय आहे. शासनाने अशी चेष्टा थांबवावी. आमदारांनी या विषयावर आवाज उठवावा, अशी मनोहर गुरव यांनी मागणी केली आहे. गरिबाला शासनाने योग्य तो न्याय द्यावा. या विषयाबाबत आमदारांनी त्त्वरित पाठपुरावा करावा व घरकूलचा निधी वाढवावा तसेच एक रकमी निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी गुरव यांनी केली. जिल्हाधिकारी यांना याबाबत माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी जिल्हाकडून निवेदन देण्यात येणार आहे, असेही गुरव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:09 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow