लांजा-दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक गाड्यांना बंदी घालण्याची मागणी

Jul 4, 2024 - 12:07
 0
लांजा-दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक गाड्यांना बंदी घालण्याची मागणी

लांजा : लांजा नायब तहसीलदार यांची बुधवारी भेट घेऊन युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे यांनी निवेदन देऊन लांजा दाभोळेमार्गे होणारी चिरे वाहतूक बंद करण्याची मागणी केली. या संदर्भातील निवेदनात असे म्हटले आहे की, लांजा तालुक्यातून पावसाळा सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक सुरू आहे.

आपण कोकणातील पावसाचा विचार करता अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. तसेच चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच लांजा दाभोळे रस्त्याचा विचार करता एवढी अवजड वाहतूक या रस्त्यावरून करू शकत नाही. तसेच सर्व चिरे उत्खनन सापुचेतळे येथून होत आहे. तरी सर्व वाहने देवधे फाटा येथून लांजाकडे न येता पालीमार्गे वाहतूक करावी, असे त्यांनी सुचविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 04/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow