लांजात 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ३३ महा-ई सेवा केंद्रे
![लांजात 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ३३ महा-ई सेवा केंद्रे](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202407/image_870x_6687c67fb3137.jpg)
लांजा : तहसील कार्यालयामध्ये विविध दाखल्यांसाठी लोकांची होणारी गदीं लक्षात घेऊन तहसीलदार प्रमोद कदम यांनी तातडीने लांजा तालुक्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ३३ महा-ई सेवाकेंद्राची नियुक्ती करून शिबिर घेण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लांजा तहसील कार्यालयाच्या सेतू कार्यालयामध्ये महिलांनी गर्दी केली. योजनेचा अर्ज, उत्पन्नदाखला व अधिवास दाखल्यासाठी आलेल्या महिलांकडून मागणी होऊ लागली. अवघ्या दोन दिवसांतच झालेल्या महिलांच्या गर्दीमुळे लांजा तहसीलदार कार्यालय गर्दीमुळे फुलून गेले आहे, शासकीय परिपत्रकानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे अर्ज १ जुलैपासूनच ऑनलाईन स्वीकारण्यात येऊ लागले. लांजा शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांची तहसीलदार कार्यालयात एकच झुंबड उडाली; मात्र मंगळवारी (ता. २) लांजा तहसील कार्यालयाच्या आवारात होणारी गर्दी पाहता तहसीलदार प्रमोद कदम यांनी परिपत्रकाद्वारे आदेश काढले आहेत. यानुसार महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला व अधिवास दाखला ही कागदपत्रे आवश्यक असून सदरचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यास गैरसोय निर्माण होत असल्याने लांजा येथे उत्पनाचा दाखला व अधिवास दाखला मिळण्यासाठी महा-ई-सेवाकेंद्रांची नियुक्ती केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 05/Jul/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)