मंडणगडमध्ये मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

Jul 5, 2024 - 11:20
Jul 5, 2024 - 15:25
 0
मंडणगडमध्ये मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

मंडणगड : तालुक्यातील ७२ मतदान केंद्रांवर तहसील कार्यालयातर्फे छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे.

२५ जुलैला मतदान केंद्रांवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कार्यक्रमात मतदार यादीतील मयत, स्थलांतरित व दुबार मतदात्यांची नावे कमी करणे, नवीन मतदार नोंदणी व मतदार यादीतील नावातील दुरुस्ती करण्यात येत आहे. अद्याप नावनोंदणी न झालेली किंवा दुरुस्ती करणे गरजेचे असलेल्या मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रांतील मतदान अधिकाऱ्यांशी अथवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क साधवा, असे आवाहन तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 05/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow