रत्नागिरी : नर्सिंग विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी 'व्हॉटस्अॅप'कडे 'कॉल लॉग'ची मागणी

Aug 30, 2024 - 11:14
 0
रत्नागिरी : नर्सिंग विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी 'व्हॉटस्अॅप'कडे 'कॉल लॉग'ची मागणी

रत्नागिरी : चंपक मैदान येथे वैद्यकीय परिचारिकेबर अत्याचाराप्रकरणी झालेल्या पोलिसांनी व्हॉटस्अॅप कंपनीकडे 'कॉल लॉग'ची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत सत्य समोर येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीडित युवतीची वैद्यकीय चाचणी पाठवण्यात आलेल्या लॅबशी संपर्क करून वैद्यकीय अहवाल लवकरात लवकर पाठवण्याबाबत सांगण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी ७ ते ८ सीसीटीव्ही फुटेज पोलिस विभागाने मिळवले आहेत. या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करून टेक्निकल डाटा मिळाल्यावर दोन दिवसांत या प्रकरणाचा छड़ा लागणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी सुरक्षितच

रत्नागिरी शहरातील नागरिक मदतीसाठी धावणारे आहेत. पीडितांना मदत मिळण्यासाठी पोलिस विभागाच्या '११२' सेवेमुळे १० ते १५ मिनिटांमध्ये मदत मिळत असल्याने ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच शहरातील शाळा, कॉलेज याठिकाणी दामिनी पथकाची गस्त सुरू आहे. पोलिस विभागाची ५ मोबाईल वाहने सतत कार्यरत असून, १५ कर्मचारी आणि वाहतूक पोलिस रात्री गस्त घालत असतात. त्यामुळे राजागिरी शहर सुरक्षितच आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow