रत्नागिरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा; ग्रामीण भागात पूरसदृश्य स्थिती

Jul 9, 2024 - 10:22
Jul 9, 2024 - 10:34
 0
रत्नागिरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा; ग्रामीण भागात पूरसदृश्य स्थिती

रत्नागिरी : मुसळधार पावसाच्या सातत्याने रत्नागिरी तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण आणि सखल भागात पाणी साचले. जोरदार पावसाने सोमेश्वर, काजरघाटी, चांदेराई, हरचेरी आदी खाडीकिनारी गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या गावांना प्रशासनाने खबरदारीच्या आणि सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान,सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याने या भागातील स्थिती निवळली आहे. 

रत्नागिरी तालुक्यात रविवारी पावसाने शंभरी पार केली होती. त्यामुळे तालुक्यातील हरचेरी, चांदेराई येथील बाजारपेठेत पाणी साचले तर हातीस गावासह तोणदे येथे गावांना पाण्याचा वेढा पडला होता. हातीसचा दर्ग्यताही जोरदार पावसाने पाणी साचले होते तर सोमेश्वर गावातील काही भगा पाण्याने वेढला. तालुक्याच्या किनारी गावातही जोरदार पावासाने घबराटीचे वाातवरण निर्माण केले. येथील भाट्ये ओरी, मिऱ्या, काळबादेवी, बसणी आदी किनारी गावातही जोरदार पावसाने झोडपले. मात्र सोमवारीपावसाचा जोर ओसरल्याने येथील जनजीवन सुस्थितीत आले. रविवारी दिवसभर कोसळणाऱ्या धुव्वाँधार पावसाने मुबंई-गोवा महामार्गावरील निवळी ते हातखंबा आणि रत्नागिरी शहराकडे येणारी वाहतूक बाधित झाली. रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ दुतर्फा वाहतूक ठप्प झाली तर काजळी नदीला पूर आल्याने हरचेरी, चांदराई आणि सोमेश्वर या भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाचे सातत्य होते. मात्र त्यात जोर नसल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली तर तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या शेतक-याच्या शेतात पाणी घुसल्याने लावणीच्या कामात काही काळ व्यत्यय आला. त्यामुळे नदीकाठच्या भातलागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातपाणी आल्याने अनेक ठिकाणी लोकाची संपर्क व्यवस्था बाधित झाली. रत्नागिरी शहरातही जोरदार पावसाने खड्यातील रस्त्यातून मार्ग काढत रत्नागिरीकर प्रवास करावा लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow