गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकरी एम. देवेंदर सिंह

Sep 5, 2024 - 12:33
Sep 5, 2024 - 12:36
 0
गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकरी एम. देवेंदर सिंह

राजापूर : गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकरी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.

गणेशोत्सव २०२४ पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात काल आढवा बैठक झाली या बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तकिरण पूजार, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जास्मिन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. देसाई, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी आदीसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यात गणेशोत्सवाची पूर्वतयारी जोरात आहे प्रशासनही कायदा सुव्यवस्था राखणे, गणेशभक्ताना योग्य ती सुविधा प्राप्त करून देणे, जिल्ह्यात खास गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्यादृष्टीने सतर्क राहा. गणेशभक्तांच्या प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारावीत. सुविधा केंद्रावर पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिम मदत टोइंग व्हॅन, क्रेन वाहन दुस्ती कक्ष, असावी वैद्यकीय रुग्णवाहिका सेवा, मोफत आपतकालीन वैद्यकीय उपचार सुविधा व मोफत चहा बिस्किट, पाणी, ओआरएस आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, गणपती उत्सवावेळी जिल्ह्यात पोलिस, होमगार्डे, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात विसर्जन घाटाकडे जाणारे रस्तेदेखील चांगले असणे गरजेचे आहेत. विसर्जन घाटावर साईट व्यवस्था, बॅरिकेट्स आदींची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दिशादर्शक फलक लावा
राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर कुठेही खड्डे राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दिशादर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी डायव्हर्शन आहे त्या ठिकाणी रेडियम दिशादर्शक फलक लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सिंह यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्युत विभागाने वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow