मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी रत्नागिरीत बालगृहाला जिन्नस

Sep 21, 2024 - 10:39
 0
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी रत्नागिरीत बालगृहाला जिन्नस

त्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील भाजप नगरसेवक, नगरसेविकांनी रत्नागिरीतील बालगृह आणि निरीक्षणगृहाला जिन्नस, वाणसामानाची मदत दिली.

शुक्रवारी दुपारी बालगृहात हा कार्यक्रम झाला.

बालगृहातील मुलांसाठी साधारण महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळी, साखर, तेल, कडधान्य, पीठ यांचे वितरण माजी नगरसेवकांनी केले. बालगृह व निरीक्षणगृह संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर सावंत, प्रकाश शिंदे यांनी मदत स्वीकारली.

यावेळी माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी म्हणाले की, मंत्री चव्हाण नेहमी कार्यकर्ते म्हणूनच काम करतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फूल ना फुलाची पाकळी देण्याचे काम नगरसेवकांनी केले आहे.

माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सदस्य सचिन वहाळकर म्हणाले, श्री. चव्हाण रत्नागिरीचे भाजपचे पालक म्हणून ८ वर्षे काम करत आहेत. त्यांनी बांधकाम खात्याच्या माध्यमातून कोकणात रेल्वेस्थानकांकडे जाणारे रस्ते व स्थानकांचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले. ते आज पूर्णत्वाकडे जात आहे.

याप्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देण्याकरिता फोनही करण्यात आला. त्यावेळी सुधाकर सावंत व सर्व माजी नगरसेवकांनी मंत्री चव्हाण यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सुधाकर सावंत यांनी सांगितले की, आमच्या इथल्या दोन विद्यार्थ्यांचे अनुकंपा भरतीमध्ये काम होत नव्हते. मग आम्ही मंत्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व माहिती ऐकून घेऊन आठ दिवसांत पत्र मिळेल असे सांगितले. पुढे जाऊन त्यांनी असे सांगितले की जर भरतीसाठी कोणाला पैसे दिले असतील तर त्वरित परत घ्यावेत, असा त्यांचा सुखद अनुभव आला. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो व मोठीमोठी पदे त्यांनी मिळोत, अशी प्रार्थना करतो.

या कार्यक्रमाला भाजपाचे भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, सरचिटणीस मंदार मयेकर, राजन पटवर्धन, मंदार खंडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर, माजी नगरसेवक मुन्ना चवंडे आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow