आरपीआयला विधानसभा निवडणुकीसाठी 10 ते 12 जागा हव्यात : रामदास आठवले

Sep 21, 2024 - 10:41
 0
आरपीआयला विधानसभा निवडणुकीसाठी 10 ते 12 जागा हव्यात : रामदास आठवले

रत्नागिरी : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमधील आरपीआय हा महत्त्वाचा घटक पक्ष असून आगामी विधानसभेला आम्हाला भाजपच्या कोट्यातून नव्हे तर घटक पक्ष म्हणून किमान 10 ते 12 जागामिळायला हव्यात, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिवसेना - भाजपची युती टिकण्यासाठी प्रत्येकी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मी भाजपला दिला होता. माझा प्रस्ताव मान्य केला असता तर हे सर्व घडलंच नसते असेही ना. आठवले यांनी यावेळी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला काही प्रमाणात अपयश मिळाले. विरोधकांनी ब्लॅकमेल करत सोशल मीडियात अफवा पसरवल्याने आम्हाला हा फटका मिळाला. पण मोदींनी मोठ़्या प्रमाणावर विकास केलेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद हा 90 टक्क्यांपर्यंत संपविण्यात आलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 21-09-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow