Ratnagiri : किनारपट्टी भागात लाटांचे तांडव

Jul 9, 2024 - 10:42
 0
Ratnagiri : किनारपट्टी भागात लाटांचे तांडव

रत्नागिरी : एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे उधाणामुळे समुद्राचे रौद्ररुप पहायला मिळत आहे. मिऱ्या किनाऱ्यावर सुमारे दोन ते तीन मीटरच्या अजस्त्र लाटा अपुर्ण बंधाऱ्यावर येऊन आदळत होत्या. लांटाचे आक्राळ विक्राळ स्वरुप पाहुन तेथील रहिवाशांच्या मनाथ धडकी भरत होती. एवढ्या उंच लाटा उसळत होत्या की, त्या बंधाऱ्यावरून वस्तीत शिरत होत्या. लाटांचे तांडव पाहूण यंदाच्या उधाणानामध्ये हा बंधारा तग धरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मिऱ्यासाठी सुमारे साडे तीन किमाच्या पक्का बंधारा मंजूर झाला आहे. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. यासाठी मंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे भूमिपुजन झाले. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे. परंतु वेळत काम सुरू न करणे किंवा पुर्ण न केल्याबद्धल रत्नागिरीचे पत्तन अभियंत्यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली.

या कामापैकी पांढरा समुद्र ते जयहिंद चौक हा टप्पा अपूर्णच आहे. या टप्प्याचे काम पुर्ण करण्यासाठी स्थानिक पत्तन विभागाच्या मागे होते. परंतु तोवर पावसाळा सुरू झाल्यामुळे हे काम लांबले आहे. त्यामुळे जुन्या बंधाऱ्यावरच स्थानिकांच्या सुरक्षेची भिस्त आहे. परंतु यंदाच्या उधाणामध्ये हा बंधारा तगधरुन रहाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज समुद्राला आलेल्या उधाणामुळे दोन ते तीन मीटरच्या महाकाय लाटा उसळत होत्या. एका पाठोपाठ एक या लाटा बंधाऱ्यावर आदळत होत्या. त्यामुळे हे पाणी बंधाऱ्या बाहेर मानवी वस्तीत शिरत होते. उधाण असे राहिले तर बंधारा फोडुन समुद्राचे हे पाणी मानवी वस्तीत घुसण्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 09-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow