चिपळूण येथील अश्वारूढ शिवपुतळा सुशोभीकरण कामाची होणार चौकशी

Jul 9, 2024 - 10:23
Jul 9, 2024 - 11:00
 0
चिपळूण येथील अश्वारूढ शिवपुतळा सुशोभीकरण कामाची होणार चौकशी

चिपळूण : शहरात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती भिंतीवर दगडी आच्छादनाचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी या तक्रारीची दखल घेत शिवपुतळा परिसर सुशोभीकरण कामाची चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. शहरातील अनंत आईस फॅक्टरीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविणे व परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुशोभीकरणाच्या भिंतीसाठी जो दगड वापरण्यात आला आहे तो अत्यंत कमी दर्जाचा आहे. अंदाजपत्रकात समाविष्ट असलेला आणि वापरण्यात येणारा दगड यामध्ये तफावत दिसून येत आहे. अंदाजपत्रकात नमूद असलेला दगड हा न.प.त ठेवणे गरजेचे होते. मात्र, तसे न करण्यात आल्याने संशय निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे अंदाजपत्रक ज्या दरपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आले आहे ते दरपत्रकच बोगस असल्याचा आरोप मुकादम यांनी तक्रारीत केला आहे. सद्यस्थितीत काम बंद असून, ठेकेदाराचे बिलही थांबविण्यात आले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow