रत्नागिरी : नवकार प्लाझा येथे उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरीला

Jul 9, 2024 - 10:55
 0
रत्नागिरी : नवकार प्लाझा येथे उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरीला

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथून दुचाकी लांबवल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना शनिवार ६ जुलै रोजी दुपारी १२ ते ३.३० वा. कालावधीत घडली आहे. याबाबत समीर जैनुद्दीन शेख (४५, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, शनिवार दुपारी १२ वा. त्यांनी आपली अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-०८-एबी-७५८५) मारुती मंदिर येथील नवकार प्लाझा येथे उभी करुन ठेवली होती. दुपारी ३.३० वा. सुमारास ते दुचाकी घेण्यासाठी नवकार प्लाझा येथे गेले असता त्यांना आपली दुचाकी मिळून आली नाही. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलम (बी.एन.एस) ३०३ (२) प्रमाणे गन्हा दाखल करण्यात आला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 09-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow