लांजा : माचाळ येथे वीज मीटरच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला तिघा पर्यटकांना चोप

Jul 9, 2024 - 11:49
Jul 9, 2024 - 12:07
 0
लांजा : माचाळ येथे वीज मीटरच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला तिघा पर्यटकांना चोप

लांजा : माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा मीटर फॉल्टी आहे अशी बतावणी करून पैसे उकळणाऱ्या पर्यटकांना येथील ग्रामस्थांनी चोप दिला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

तालुक्यातील माचाळ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षा पर्यटनासाठी समुद्रसपाटीपासून उंच असणाऱ्या माचाळला पर्यटकांची मोठी पसंती आहे. शुक्रवारी लांजातील तीनजण माचाळ येथे आले होते. येथील एका महिलेकडे या तिघांनी जेवणाची ऑर्डर दिली. दुपारी मौजमस्ती झाल्यानंतर जेवण झाले. त्यांच्याकडे जेवणाचे बिल मागितले. त्यावेळी या पर्यटकांनी बिल देण्यास नकार दिला. या तीन पर्यटकांनी तुमचा मीटर फॉल्टी आहे, तुम्ही दुसऱ्याकडून वीज घेतली आहे असे सांगून तुम्हाला वीस हजार रुपये दंड असल्याचे सांगितले आणि संबधित महिलेकडून दोन हजार रुपये घेतले. याची माहिती माचाळमधील अन्य ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी मोटारीतून आलेल्या तिघांना ताब्यात घेऊन जाब विचारला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चांगला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow