मिरजोळे येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन

Aug 31, 2024 - 11:18
Aug 31, 2024 - 12:19
 0
मिरजोळे येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन

त्नागिरी : मिरजोळे पाडावेवाडी (कुवारबाव) येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर - आरोग्यं परम् धनम् अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

यावेळी ते म्हणाले, आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये चांगली आरोग्य सुविधा मिळावी, हे शासनाचे धोरण आहे. आठ दिवसांपूर्वी अशा प्रकारच्या एका दवाखान्याचे मिरकरवाडा येथे उद्घाटन झाले. आरोग्याची सुविधा घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे, सुविधा पोहोचत असताना कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. या दवाखान्याचा कमीत कमी वापर व्हायला हवा. परंतु आरोग्याच्या आवश्यक सुविधा येथे उपलब्ध असणे गरजेचे आहे. या आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सरपंच रत्नदीप पाटील, माजी सरपंच राजेश तोडणकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मिरजोळे, कुवारबाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow