बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील कोणकोणत्या गाड्या रद्द?, वाचा एका क्लिकवर..

Jul 10, 2024 - 10:20
 0
बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील कोणकोणत्या गाड्या रद्द?, वाचा एका क्लिकवर..
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे काही दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशातच कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे. 
मदुरे -पेडणे भागातील पेडणे बोगद्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेओव्हरहेड वायरवर (OHE) झाड कोसळले. त्यामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही वेळाने अडथळा दूर झाल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. पण आता पेडणे बोगद्यात साठलेल्या पाण्यामुळे या मार्गावरुन गाड्या चालवणं कठीण जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास बोगद्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावरच्या 10 गाड्या रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर वेर्णा ते करमाळी दरम्यान रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं त्यामुळे सोमवारी पहाटेपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईच्या दिशेने जाणारी नेत्रावती तसेच एर्नाकुलममधून दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस सहा -सात तास उशिराने धावत होती. पावसामुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी
  • 10 जुलैची मुंबई सीएसएमटी - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक - 22229)
  • मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस ( गाडी क्रमांक -12051 )
  • मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन मांडोवी एक्स्प्रेस ( गाडी क्रमांक - 10103)
  • 9 जुलैची मुंबई सीएसएमटी - मंगळुरु जंक्शन एक्स्प्रेस (गाडी क्रमांक - 12133)
  • निजामुद्दीन -एर्नाकुलम जंक्शन मंगला एक्स्प्रेस - पनवेल - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा -मडगाव मार्गे वळवली (गाडी क्रमांक - 12618)
  • मडगाव जंक्शन -मुंबई सीएसएमटी मांडोवी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक -10104)
  • मडगाव जंक्शन - सावंतवाडी रोड (गाडी क्रमांक - 50108)
  • तेजस एक्स्प्रेस (गाडी क्रमांक - 22120)
  • जनशताब्दी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक - 12052)
  • सावंतवाडी रोड -दिवा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक - 10106)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow