खेड शहर चोरट्यांच्या 'रडार'वर ?

Jul 20, 2024 - 13:41
Jul 20, 2024 - 13:46
 0
खेड शहर चोरट्यांच्या 'रडार'वर ?

खेडः शहरातील गांधीचौक या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या कल्याणी स्टोअर्स आणि सिद्धी मेडिकल स्टोअर्सचे कुलूप व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. हा प्रकार १६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. त्यांनतर शहरातील महाडनाका, डाकबंगला व इतर भागात देखील चोरट्यानी बंद सदनिकांत चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याची चर्चा असून शहरात अनेत भागात रेकी करून चोरट्यांनी खेड पोलिसांच्या समोर आव्हान उभे केले आहे. चोरट्यांच्या मध्यरात्रीच्या वेळी वावरामुळे खेड शहरातील नागरिक व व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या वेळेपासून ते पहाटे ६ वाजण्याच्या मुदतीत पोलिसांची गस्त सुरू असते. तसेच सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यरत असतानाही अज्ञात चोरट्यांचा वावर होतोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरांनी अनेक ठिकाणी रेकी केल्याचे समजते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow