बेलेबल वॉरंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकित कर्जदारास ५ हजाराचा दंड

Jul 11, 2024 - 11:11
 0
बेलेबल वॉरंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकित कर्जदारास ५ हजाराचा दंड

खेड : बेलेबल वॉरंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेचे थकित कर्जदार जीवन चंद्रसिंग कोकणी यांना येथील न्यायालयाने ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. १५ हजार रूपयांचा जामीन मंजूर करत कर्ज रक्कम भरण्याचे आदेशही दिला आहे. बँकेच्या पॅनलवरील ॲड. संदेश वंदना गणपत चिकणे यांनी बँकेच्यावतीने काम पाहिले.

जीवन कोकणी यांनी बँकेकडून २०१८ मध्ये ८ लाख ८५ हजार रूपयांचे पगार कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड त्यांनी नियमित न केल्याने बँकने वसुलीसाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यापोटी २०२१मध्ये कर्ज वसुलीसाठी बँकेस धनादेशही दिला होता. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश न वटताच परत आला होता. या प्रकरणी बँकेने चेक अनादरप्रकरणी येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कर्जदार कोकणी हे बँकेने दिलेल्या कोणत्याही नोटीस घरी असूनही स्वीकारत नव्हते. तसेच २०२१पासून दाखल तक्रारीबाबत पकड वॉरंट बजावणी करण्यासही ते टाळाटाळ करत होते. अखेर या प्रकरणी पोलिसांनी तपास करून कोकींना अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता बेलेबल वॉरंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ हजार रूपये दंड ठोठावला. तसेच १५ हजार रूपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow