आ. राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा उत्साहात संपन्न

Jul 11, 2024 - 11:47
 0
आ. राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त  राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा  उत्साहात  संपन्न

रत्नागिरी : लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्राचे आ. राजन साळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भडकंबा येथे राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत घाटी गटात द्वारकानाथ माने तर गावठी गटात सांबा कांडकरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत ५० हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. पाच हजारहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आंनद लुटला. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना दाभोळे जिल्हा परिषद गटाच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी केक कापून आ. साळवी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर फीत कापून स्पर्धेला प्रारंभ झाला. एकापेक्षा एक अशा सरस बैलजोड्यांनी उपस्थित्यांचे डोळयांचे पारणे फेडले. यावेळी आ. राजन साळवी यांच्या समवेत त्यांच्या पत्नी अनुराधा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, मा. जिल्हा परिषद सभापती रजनी चिंगळे, दत्ता घुमे, अजय सावंत, बापू शिंदे, शेखर आकटे आदी उपस्थित होते.

घाटी गटात विरोबा मानाई ग्रुप (द्वितीय), वैभव लाड (तृतीय), स्वराज गुरव (चतुर्थ), नवलाई देवधे (पाचवा), गावठी गटात जय संबा पाटगाव (द्वितीय), सुरेश सोलकर (तृतीय), हर्षद साळुंखे (चतुर्थ), आई जुगाई चोरवणे (पाचवा) क्रमांक पटकवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow