रत्नागिरी जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवेक जोशी विजेता

Jul 20, 2024 - 11:28
 0
रत्नागिरी जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवेक जोशी विजेता

त्नागिरी : या वर्षीची कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा खुली निवड बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरीत पार पडली. स्पर्धेत चिपळूणचा विवेक जोशी विजेता ठरला.

जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी चेस अॅकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतून चार बुद्धिबळपटूंची निवड जळगाव येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता करण्यात आली.

या स्पर्धेत ओंकार सावर्डेकर उपविजेता ठरला. विवेक व ओंकार दोघांनीही सात फेऱ्यांमध्ये सहा गुण प्राप्त केले, परंतु सरस टाय ब्रेकवर विवेकने बाजी मारली. रत्नागिरीच्या यश गोगटे व सौरीश कशेळकर यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला.

विविध गटांमधील उत्तेजनार्थ विजेते असे - पंधरा वर्षांखालील प्रथम व द्वितीय : हृषीकेश कुंभारे, शुभम बावधनकर. तेरा वर्षांखालील प्रथम व द्वितीय : नंदन दामले, रुमीन वास्ता.

अकरा वर्षांखालील प्रथम व द्वितीय : आयुष रायकर, आराध्य गर्दे, नऊ वर्षांखालील प्रथम व द्वितीय : शर्वील शहाणे, विहंग सावंत, महिलांमध्ये प्रथम व द्वितीय : सई प्रभुदेसाई, मृणाल कुंभार.

स्पर्धेस खेड, राजापूर, चिपळूण व रत्नागिरीतील एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमी येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेक सोहनी, सुभाष शिरधनकर, मंगेश मोडक, चैतन्य भिडे यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow