रत्नागिरी : भंगार खरेदीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

Jul 11, 2024 - 12:33
 0
रत्नागिरी : भंगार खरेदीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड कार्यालयातील निर्लेखित केलेले संगणक, प्रिंटर व इतर अनुषंगिक आयटी उपकरे, इलेक्ट्रॉनिक यंत्र सामुग्री, निर्लेखित केलेली वापरुन खराब झालेली हत्यारे व अवजारे, सयंत्रे, यंत्रसामग्री, एमएस, पत्रा, पितळी, तांब्याचे, अॅल्युमिनियम स्क्रॅप, इतर लाकडाचे तुकडे, लॉखडी भुसा, रद्दी यांची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे.

इच्छुक खरेदीदाराने आपले देकार बंद पाकिटातून प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण, नाचणे रोड कार्यालयात २० जुलै रोजी दुपारी ३ पर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करून आणून द्यावीत, असे आवाहन प्राचार्य श. ग. कोतवडेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow