संगमेश्वर : हेदली येथे घरात वृद्धाचा मृतदेह सापडला

Jul 22, 2024 - 11:07
 0
संगमेश्वर : हेदली येथे घरात वृद्धाचा मृतदेह सापडला

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील हेदली बौद्धवाडी येथे शनिवारी मनोरुग्णाचा मृत्तदेह आढळून आला आहे. याबाबतची खबर संगमेश्वर पोलिसांना देण्यात आल्याने संगमेश्वर पोलिस घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पंचनामा करून आकस्मिक मृत्य म्हणून नोंद करण्यात आली आहे.

हेदली बौद्धवाडीतील एका घरामध्ये, रामचंद्र सुडकू सावंत (अंदाजे वय ६२) हा मनोरुग्ण घरात एकटाच राहत होता. त्याच्या शेजारी राहणार संजय सावंत यांच्या घरी जाणे येणे होते. संजय यांची पत्नी जेवण खाणे देत असे. मात्र गेली दोन दिवस तो जेवणासाठी न आल्याने संजय याच्या पत्नीने जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता रामचंद्र पडलेला आढळला. ही घटना तिने वाडीतील इतर ग्रामस्थ्यांच्या कानावर घातल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले असता रामचंद्र हा मयत झाल्याचे आढळून आले.

या घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील नरेंद्र खानविलकर यांना दिली. खानविलकर यांना माहिती मिळताच प्रत्यक्ष जाऊन ही व्यक्ती मृत झाल्याची खात्री केली आणि रितसर संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली.

संगमेश्वर पोलिसांना खबर मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे, बिट अंमलदार सचिन कामेरकर, श्री. खोदल, पो, अंमलदार श्री. म्हसकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एकूण परिस्थिती पाहता या वृद्धाचा मृत्यू हा दोन दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेतील मृताच्या अंगावर कोणत्या जखमा अथवा व्रण आढळून न आल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी रितसर पंचनामा व शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक तपास बिट अंमलदार सचिन कामेरकर करीत आहेत. मृत व्यक्तीच्या पक्षात भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow