स्वरूपानंद पतसंस्थेच्या 'स्वरूप ठेव मानांकन उपक्रमाला' आषाढ धारांइतका दणदणीत प्रतिसाद : ॲड. दीपक पटवर्धन

Jul 16, 2024 - 10:28
 0
स्वरूपानंद पतसंस्थेच्या 'स्वरूप ठेव मानांकन उपक्रमाला' आषाढ धारांइतका दणदणीत प्रतिसाद : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वरूपानंद पतसंस्थेने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिकाधिक ठेवीदारांना ठेव ठेवण्यास उद्युक्त करावे, यासाठी १५ जुलै ला 'स्वरूप ठेव मानांकन उपक्रम' राबवला होता. या एका दिवसात किमान १०० नवीन ठेवीदारांच्या ठेवी संस्थेमध्ये जमा व्हाव्यात असा प्रयत्न होता. या प्रयत्नाला १००% यश ठेवीदारांनी दिले. दणक्यात बरसणाऱ्या आषाढ धाराही ठेवीदारांना संस्थेत पोचण्यापासून परावृत्त करू शकल्या नाहीत.  ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेत १ कोटी ८२ च्या ठेवी जमा केल्या या पैकी १०७ ठेवीदार संपूर्णपणे नवे ठेवीदार असून संस्थेने केलेला १०० नव्या ठेवीदरांचा संकल्पही एका दिवसात पूर्ण झाला. या ठेव वृद्धीमासात आज अखेर ९०० ठेव खाती सुरू झाली असून ही संख्या १००० च्या वर जाईल, असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.

२०२४-२५ या वर्षी अखेरीस ३५० कोटींचा ठेवटप्पा गाठण्याचे उद्दिष्ट मनात धरून  ३२० कोटीपर्यंतचा टप्पा पूर्ण होईल. तर २० जुलै पर्यंत ३२५ कोटींचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न राहणार आहे. आजचा (सोमवार) दिवस रोचक होता. कर्मचारी, अधिकारी वर्गाने प्रामाणिकपणे राबवलेले संपर्क अभियान फलद्रूप झालं. प्रत्येक ब्रॅंचमध्ये किमान १० ते १५ ठेव खाती नव्याने सुरू झाली. सकाळपासून वरूणराज दणक्यात बरसत होते. त्यामुळे ठेव संकलनावर विपरित परिणाम होईल अशी भीती मनात होती. पण सकाळपासूनच ठेवीदारांचा प्रतिसाद प्राप्त होत होता आणि पाहता पाहता १०० नवीन खातेदारांचा इष्टांक पूर्ण होऊन दिवसा अखेरीस २२१ ठेवीदारांनी एकाच दिवसात रु. १ कोटी ८२ लाखांची गुंतवणूक स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत केली गेली. अजूनही ठेववृद्धी मासाचे ४ दिवस शिल्लक असून २० जुलैपर्यंत ठेवीदारांनी आकर्षक व्याजदराचा लाभ घेऊन मोठी गुंतवणूक स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये करावी, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow