वृद्ध आईला मारहाण करीत सोन्याची माळ चोरली; मुलीविरोधात गुन्हा दाखल

Sep 4, 2024 - 11:51
 0
वृद्ध आईला मारहाण करीत सोन्याची माळ चोरली; मुलीविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : शेजारी शेजारी वडापावचा व्यवसाय असल्याच्या पूर्वीच्या वादातून वृद्ध आईला शिवीगाळ व मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडून चोरून नेल्याप्रकरणी मुलीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वा. सुमारास वरचा फगरवठार येथे घडली. 

या प्रकरणी वैशाली विलास वालम (रा. वरचा फगरवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला हि फिर्यादीची मोठी मुलगी असून दोघांचेही वडापाव विक्रीचे व्यवसाय शेजारी शेजारी आहेत. या कारणावरुन त्या दोघींमध्ये वाद सुरु आहेत. या वादातून रविवारी संशयित मुलीने फिर्यादी आईच्या घरी जाउन तू खोली खाली कर, खोली विकून आम्ही पैसे घेऊ, असे म्हणून पूर्वीच्या वादाचा राग मनात धरुन स्वतःच्या आईला शिवीगाळ व हातांच्या थापटांनी मारहाण केली. त्यानंतर तिला धक्का देउन खाली पाडून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडून चोरुन नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मुलीविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनिमय २०२३ चे कलम ३०५ (अ), ११५ (२), ३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow