रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेतर्फे राधा मोहन भट यांचा सत्कार

Jul 16, 2024 - 14:30
 0
रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेतर्फे राधा मोहन भट यांचा सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हामध्ये प्रथमच संगीतोपचार पद्धतीने अनेक रोगांवर, गर्भवती महिलांसाठी, शाळेतील मुलांसाठी, मानसिक आजार अश्या अनेक वेगवेगळ्या आजारांसाठी उपचार केले जातील.
     
संगीत क्षेत्रामध्ये ३० वर्ष अनुभव, २००७ मध्ये गायन संगीत विशारद पदवी घेऊन, २०१२ मध्ये संगीत अलंकार ,२०१४ मध्ये सुगम संगीत डिप्लोमा, २०१६ मध्ये MA. Music ही पदवी घेऊन, आता २०२४ मध्ये  (music therapy ) सांगितोपचार ही पदवी रत्नागिरीच्या राधा मोहन भट यांनी मिळवली आहे. रत्नागिरीकरांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.
       
रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेतर्फे याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष, कार्यवाह आणि इतर सदस्य यांनी गोदूताई जांभेकर विद्यालय येथे अनेक कलाकारांच्या उपस्थितीत राधा मोहन भट यांचा शनिवार दि. १३ - ०७ - २०२४ रोजी सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि  शुभेच्छा दिल्या.

त्याचवेळी राधा भट यांच्या मातोश्री आणि त्यांची मोठी बहीण यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून बक्षीस आणि आशिर्वाद दिले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow