Ratnagiri : पावसामुळे जिल्ह्यात २ कोटी ६० लाखांचं नुकसान

Jul 17, 2024 - 09:59
Jul 17, 2024 - 10:24
 0
Ratnagiri : पावसामुळे जिल्ह्यात २ कोटी ६० लाखांचं नुकसान

 रत्नागिरी : गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात सुमारे दोन कोटी ६० लाखाची हानी झाली आहे. तर ६१ कुटंबातील २४७ पूर बाधितांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने प्रमुख नद्यांनी जलस्तर ओलांडल्याने आलेल्या पूराने नदी किनारी भागात असलेल्या २१ गावातील १५९ शेतकऱ्यांची सुमारे १५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल उत्पत्ती नियंत्रण कक्षाने नोंदविला आहे.

सोमवारी संपलेल्या २४ तासात म्हणजे रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यात एकूण दिड हजार मिमी पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये पक्क्या घरासहित अनेक मालमत्ताचे अंशतः तर काही भागात पुर्णतः नुकसान झाले. यामध्ये १२९ अंशतः घरांचे ७४ लाख ११ हजार ७६६ रुपयाचे नुकसान झाले. तर पुर्णतः १५७ घरांचे ६१ लाख ४२ हजार ७९६ रुपयांचे नुकसान झाले. अंशतः आणि पुर्णः गोठ्याचे अनुक्रमे दहा लाख ८ हजार ९४५ आणि ६ लाख ३८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. ५१ खासगी मालमत्तांचे ३० लाख ४८ हजार ६०० सार्वजनिक मालमत्तांचे ४७ लाख २५ हजार ९५०, ३५ दुकानदारांचे २७ लाख ७५ हजार ५०५ रुपयांचे नुकसान झाले.

मुसळधार पावसने जिल्ह्यातील ११ जनावरे (गुरे) दगावल्याने दोन लाख ५ हजाराची हानी झाली. तर १५९ शेतक-यांची भात शेतीबरोबर नाचणीच्याही रोपरांटोंकावरोबर लावणी केलेल्या पिकांचीही हानी झाली आहे. नद्यांच्या परिघात आणि दुर्गम भागात झालेल्या पूरस्थितीत ६१ कुटुंबांमधील २४७ लोंकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करावे लागले, यामध्ये मंडणगड तालुक्यात दोन कुटंबातील १० व्यक्ती, चिपळूण तालुक्यातील ८ कुटंबांतील ४२ आणि गुहागर तालक्यातील ८. कुटंबातील ११ व्यक्तींनी नजीकच्या नातेवाईकांकडे सुरुक्षित स्थलांतरीत करण्यात आले. जगबुडीला आलेल्या पुरामुळे खेड तालुक्यातील ४७ कुटुंबातील १८४ लोकांना स्थलांतरित्त करण्यात आले. यामध्ये ५२ लोकांना नातेवाईकांच्या घरी, ४१ लोकांना मुकादम प्रशालेत, ८४ जणांना तटकरे सभागृह आणि ७ जणांना एका हितचितंकाच्या घरी स्थलांतरित करण्यात आले. रत्नागिरी शहरात फगरवठार येथे पावसामुळे भिंत कोसळून तिघेजण जखमी झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow