मुंबई विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

Jul 20, 2024 - 17:06
 0
मुंबई विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी केंद्रावर विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. 

मुंबई विद्यापीठाचे एम. एस्सी. अॅनालिटिकल केमिस्ट्री, एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम. एस्सी. पर्यावरणशास्त्र, एम. एस्सी. झुलॉजी तसेच एम.ए. पत्रकारिता व एम.ए. राज्यशास्त्र हे अभ्यासक्रम आहेत. २९ जुलैपर्यंत, विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना शासनाची शिष्यवृत्ती आहे, असे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:35 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow